चंद्रपूर:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.17 सप्टेंबर मोदींजींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी भाजपा जनसंपर्क कार्यालयात केक कापून आनंद व्यक्त केला.या प्रसंगी विविध योजनेतील लाभार्थ्यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात राजू दागमवार,दशरथ सोनकुसरे,प्रवीण करमरकर,विशाल इंदूरकर,महेश उसगावकर,कावडुजी क्षीरसागर,करण बोरकुटे,संजय हलधर,ललिता सरकार ,परूल बिश्वास यांचा प्रामुख्याने समावेश या कार्यक्रमाला डॉ मंगेश गुलवाडे सुभाष कासोनगोटूवार रविद्र गुरनूले विठ्ठल डुकरेअंजली घोटेकर विशाल चद्रकल सोयाम निंबाळकर रमेशजी भुते, सूर्यकात कुचनवार रवि जी चहारे , सैयद चांद, रघुवीर अहिर, सगिता ताई खांडेकर, मुगदा खांडे, बाळू कोलनकर, जहीर भाई, विजय उईके,निशिकांत महागावकर दिनकर सोमलकर अजय सरकार जयश्री जुमडे धम्मप्रकाश बसणे महेंद्र जुमडे प्रलय सरकार वर्ष सोमलकर नूतन मेश्राम अंकित यादव ज्योती उगेमोगे सोमनाथ जाधव पंकज यादव पंकज विश्वास संदिप आगलावे दशरथ सोनकुसरे मुकेश गाडगे पुंडलीक उरकुडे प्रदिप किरमे जंगेद्र अडगूलवार तेजा सिंग दिवाकर पुदटवार शांताराम भोयर रेखा चने रंजना उमाटे रामनारायण रविदास संदिप उरकुडे रविंद्र काळे राजेंद्र किळे राजेंद्र दागमवार अरून झटे यांची उपस्थिती होती.राहुल पावडे पुढे म्हणाले,सेवा पंधरवडा अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार आहे. सेवा पंधरवड्यात युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.त्याचाच भाग म्हणून रविवारी महानगरातील 05 मंडळात ‘घर चलो अभियानाची सुरवात करण्यात आली.पावडे पुढे म्हणाले,02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रम ही होणार आहेत. आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व , विकासाची दृष्टी , धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले 9-वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. सेवा,सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष संघटनेकडून त्यांचा सेवाभाव विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
Home Breaking News भाजपाने केला लाभार्थ्यांचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य