जिवती / कोरपना- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन सोहळा निमित्त दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिवती व कोरपना येथे ध्वजारोहण करून उपस्थित नागरीकांना हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभप्रसंगी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वतंत्र भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचे स्मरण करीत त्यांच्या कणखर भूमिकेमुळे आपणास निजाम स्टेटमधून मुक्तता लाभली म्हणून हा आपणा सर्वांसाठी स्वातंत्र्य दिवस व आनंददायी सोहळा असल्याचे अहीर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगीतले.
प्रारंभी जिवती येथील छत्रपती शिवाजी महाराज व पुज्यनिय रामराव महाराजांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जिवती येथील मंदीराच्या पटांगणात आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे, देवराव भोंगळे, राजु घरोटे, गिरमाजी, सुरेश केंद्रे, महेश देवकेते, गोदावरी केंद्रे, दत्ता राठोड यांचेसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात पार पडलेल्या मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यास भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, रमेश मालेकर, किशोर बावणे, शिवाजी सेलोकर, पुरूषोत्तम भोंगळे, सतिश उपलेंचवार, निलेश ताजने, महादेव एकरे, अरूण मडावी, संजय मुसळे, अमोल आसेकर, विशाल गज्जलवार, राहुल सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. विश्वकर्मा जयंती दिनी लोकार्पित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे ग्रामिण कारागीरांचे उत्थान होतांनाच ओबीसींच्या प्रगतीमध्ये सुध्दा भर पडेल असे अहीर यांनी सागीतले.
याप्रसंगी विविध गावातून आलेल्या कारागीरांचा अहीर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दोन्ही ठिकाणी प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबूक व खाऊचे वितरण कर
ण्यात आले.