चंद्रपूर :- पोळा हा अनेक शेतकऱ्यांच्या राजाचा मोठा सण आहे. या राजाला सन्मानित व गौरवांनवित करण्याकरिता प्रगती नगर निवासी यांनी भव्य बैल जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात निरीक्षक म्हणून सी. जी. एम, नगर सेवक सुधीर कारंगल,सब एरिया, माजी नगर सेविका राजलक्ष्मी सुधीर करांगल हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक सुधीर कारांगल,अमोल हालदार,किशोर तुम्मेवार, लक्ष्मण कोलुगुरी,विश्वजीत सिंह,आदी उपस्थित होते. प्रगति नगर येथील भव्य बैल जोडी सजावट स्पर्धेत एकूण १८६ जोड्यांनी सहभाग नोंदविला। अनेक जोड्या या उत्कृष्ट सजविल्या होत्या. निरीक्षकांना निरीक्षण अहवाल सादर करताना तारेवरची कसं करावी लागली. त्यात प्रथम क्रमांक जतिन नरेश दागम, यांच्या जोडीला, द्वितीय पारितोषिक शान रॉय यांना, तर तृतीय बक्षीस यांश लावण्य यांच्या जोडीला देण्यात आले. व प्रोत्साहन वर बक्षीस यांच्या अमोग रच्चावर जोडीला देण्यात आले. बक्षीसात प्रथम सम्मान चिन्ह १५०१/ही. द्वितीय सम्मान चिन्ह १००१/ही व तृतीय ५०१/- सम्मान चिन्ह देण्यात आले. स्पर्धेत जोड्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कमेटीचा व्यवस्थापन अथवा नियोजन चांगल्या असल्यामुळे प्रगती नगर येथील बैलजोडी स्पर्धा शांततेत पार पाडली. कार्यक्रमात कमिटीचा अध्यक्ष अर्जुन कुंडू ,उपाध्यक्ष अनिकेत लांजेवार रामटेके, कोषाध्यक्ष अनिकेत गेडाम, प्रमुख कार्यकर्ता निखिल दुरटकर कार्यकर्ता अभिनव देवनाथ व सदस्य. पियुष कातकर शिवम तिवारी ज्ञानेन्द्र गौरकर राहुल वाघ गौरव गुंडेवार अनुराग बाबरिया प्रतीक गैनवार, गौरव गाईनवार, दिलीप सोंकुसरे,लवण्य पत्कोट्वार,प्रथमेश जाधव,तन्मय शहा,अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.