तान्हा पोळ्याचे व उत्सव समिती चे आयोजक आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष व युवाशक्ती ग्रामविकास संघटना चे जिल्ह्याध्यक्ष श्री योगेश भाऊ मुऱ्हेकर यांनी सहकार्याबद्दल मानले सर्व म्हाडा वसाहतीतिल जनतेचे आभार!
दाताळा :-म्हाडा वसाहतीतील हनुमान मंदिर पटागणांत मागील दहा वर्षा पासून तान्हा पोळा सण साजरा करण्याची परंपरा अबाधित असून यंदा ११व्या वर्षी देखील छोटया मोठया बालगोपालांनी, महिलांनी व पुरुषांनी सक्रिय सहभाग घेऊन मोठया उत्साहात साजरा केला. तान्हा पोळ्याच्या निमित्याने म्हाडा वसाहतीतील सर्व जनता हनुमान मंदिरावर उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. दरवर्षी पेक्षा या वर्षीच्या तान्हा पोळ्याला दुप्पट भाविक व जनता उपस्थित झाल्यामुळे आयोजक श्री योगेश भाऊ मुऱ्हेकर व मंडळाने सर्व म्हाडा वासियांचे आभार मानले. डी जे च्या तालावर सर्व बालगोपालांनी कार्यक्रमांचा आंनद घेतला हनुमान जल्मोउत्सव समिती तर्फे तान्हा पोळ्यात येणाऱ्या सर्व बाल गोपालानां शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
आयोजक मंडळाला विशेष सहकार्य करणारे ईश्वर सहारे, अजिंक्य ओगुलवार, हर्षल येलमुले, सचिन टिपातले, प्रशांत पुल्लकवार, मोनूभाऊ पुल्लकवार, जितेंद्र सोमलकर,डी जे नागेश, प्रसन्न रामटेके, सोहम ठाकूर, मयूर निमसटकर वैभव जगताप, आशिष जोगी, बंटी ठोंबरे, तुषार आडपेवार व इतर मंडळीचे कार्यक्रमाचे आयोजक श्री योगेश भाऊ मुऱ्हेकर यांनी विशेष आभार मानले.