चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. तसेच ओबीसींच्या रखडलेल्या विषयांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा मराठा समाजाला जर कुणबी मधून ओबीसी आरक्षण दिले गेले. तर ओबीसी मधील जवळपास अडीच ते तीन हजार जातीतील विद्यार्थ्यांना वरती हा अन्याय होईल म्हणून या रास्त मागणीला घेऊन ते उपोषण करत असून त्यांच्या या उपोषणाला आज कुणबी युवा चंद्रपूर संघटनेकडून जाहीर समर्थन तथा पाठिंबा देण्यात आले. तसेच ओबीसी समाजाला शासनाने कमजोर समजू नये. जर ओबीसी समाजाविरुद्ध चुकीचे निर्णय घेण्यात आले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात गंभीर उमटतील याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी . असा इशारा कुणबी युवा चंद्रपूर तर्फे देण्यात आला या वेळेला युवा जिल्हा समन्वयक श्री. राजू कुडे, संदेश खडसे, ॲड. प्रफुल मुरकुटे, सुप्रीत कुडे, विश्वनाथ पाल, सुधीर पिंगे, दिनेश देरकर, मोहन दरेकर तसेच अनेक युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.