लाडबोरी: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी केंद्र मधील विध्यार्थी च्या शारीरिक कला गुणांना चालना मिळावी, व अभ्यासा सोबत त्याच्या कलागुण पण दिसून यावा या साठी शासना कडून मानसिक विकासा सोबत शारीरिक विकासासाठी स्पर्धा घेण्या येतात, या वर्षी केंद्रातील स्पर्धा घेण्याचा सन्मान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी यांना मिळाला असून,
संपूर्ण शिक्षकांनी या आयोजन शाळेच्या पटांगणात केले होते, गडबोरी केंद्र अंतर्गत येत असलेल्या मिनघरी, वाकल, उटी ( माल ) उमरवाही, वाकल, वानेरी, रामाळा, गडबोरी, टेकरी व लाडबोरी जिल्हा परिषद शाळेच्या विध्यार्थी नि सहभाग नोंदविला होता,नवरत्न स्पर्धा मध्ये एकूण नऊ स्पर्धा होत्या त्या मध्ये कथाकथन, स्वयंस्फूर्ती, वादविवाद, एकपात्री भूमिका, बुद्धीमापन , चित्रकला, सूंदर हस्ताक्षर, स्वयंस्फूर्ती लेखन, स्मरणशक्ती या स्पर्धा चा समावेश होता,सहभागी झालेल्या विध्यार्थी नि उत्तम सहभाग नोंदविला होता,आपल्या अंगात असलेल्या कलेची चमक विध्यार्थी मध्ये दिसून आली, सदर स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शंकर चिलबुले उपस्थित तर उद्दघाटक म्हणून सुनिल गेडाम स्थान भूषविले होते,तर अतिथी मध्ये मुख्याध्यापक मंदाळे सर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सीमा गरमळे, मुख्याध्यापक रामटेके सर मंचावर उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री वसाके मॅडम यांनी केले, तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुरनुले सर, ठाकरे मॅडम, रहांडले सर यांनी परिश्रम घेतले.