करण आर. कोलुगुरी
मुख्य संपादक
मो.7378660619.
चंद्रपूर:- रामाळा तलाव ते गंज वार्ड चौक कडून सरदार पटेल महाविद्यालय या मार्गावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहने उभे असतात,या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक) यांनी या क्षेत्राला नो पार्किंग झोन किंवा जड वाहने सरदार पटेल महाविद्यालय मार्गावर जाणार नाही याकरिता बॅरीयर लावावे अश्या मागण्या घेऊन 8 डिसेंबर 2022 प्रशासनाला निवेदन दिले.यानंतर प्रशासनाने कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे परत 31 मार्च 2023 ला प्रशासनाला स्मरण पत्र देण्यात आले तरीही प्रशासनाकडून संबंधित विषयावर दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे 13 सप्टेंबर 2023 ला पुन्हा निवेदन देत सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज ठेंगणे यांनी संबंधित विषयावर प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही तर कार्यकर्ता सह तीव्र आंदोलन करू असा ईशारा दिलेला आहे.*