चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव “.! वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग. हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी. प्रथम बक्षीस 1 लक्ष 51 हजार रुपये.

0
3

 

चंद्रपूर 11 डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन संपुर्ण राज्यातील हरहुन्नरी कलावंतांचा यात समावेश असावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे.

नववर्षातील 03 जानेवारी ते 06 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येणार आहे. शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर,वृक्षांवर विविध विषयांवर चित्र रेखाटण्यात येणार असुन महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही शहरातील रहिवासी नागरीक यात सहभागी होऊ शकतो. वयाचे बंधन नसल्याने व्यावसायिक तसेच हौशी चित्रकारांना सुद्धा भाग घेता येणार असुन उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत सार्वजनिक ठिकाणी सभोवताली उपलब्ध असलेल्या वस्तु / झाडी इत्यादींचा वापर करून कलात्मक पेंटींग करणे अपेक्षित आहे. क्रिएटिव्ह पेंटिंग करतांना शहरातील सार्वजनिक स्थळांच्या आजूबाजूचा परिसराचा वापर करता येणार आहे उत्कृष्ट संकल्पनेला गौरवान्वित केले जाणार आहे.

 

भाग कसा घ्यावा – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScJ5a7bq6mLd7MTc-yT4o4UWgI7oD3j6BXJdVhNvNmjTEj_tg/viewform या गुगल लिंकद्वारे स्पर्धेत भाग घेता येईल.सदर लिंक ही मनपाच्या फेसबुकवर सुद्धा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 8329169743 ,9881585846,7089839525 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

 

बक्षिसे – भिंतीचित्र पेंटींग स्पर्धेत व्यावसायिक चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट ठेवण्यात आला आहे.

व्यावसायिक चित्रकार ग्रुप –

1. प्रथम – 1 लक्ष 51 हजार रुपये

2. द्वितीय – 1 लक्ष रुपये

3. तृतीय – 51 हजार रुपये

4. प्रोत्साहनपर – 10 बक्षिसे

व्यावसायिक चित्रकार व्यक्तिगत –

१. प्रथम – 71 हजार रुपये

२. द्वितीय – 51 हजार

३. तृतीय – 31 हजार रुपये

४. प्रोत्साहनपर – 10 बक्षिसे

वृक्ष पेंटिंग –

१. प्रथम – 21 हजार रुपये

२. द्वितीय – 15 हजार

३. तृतीय – 11 हजार रुपये

क्रिएटिव्ह पेंटिंग –

१. प्रथम – 21 हजार

२. द्वितीय – 15 हजार

३. तृतीय – 11 हजार

 

भाग घेण्यास पात्रता : स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे चित्रकलेत पारंगत असावे या दृष्टीने स्पर्धकांसाठी पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत.

१. चित्रकला शिक्षक

२. ललित चित्रकला

३. आर्ट डिप्लोमा /एटीडी धारक किंवा प्रवेश घेतलेला / शिक्षण घेत असणारे ( शिकाऊ विद्यार्थी )

४. भिंती चित्रकला / स्पर्धांमधे विजेते असल्याचे प्रमाणपत्र असणारे

५. कला किंवा चित्रकला दुकान किंवा तसा पुरावा हवा

६. रेखाचित्र मास्टर ( ATD )

 

स्पर्धेचे विषय :

1. स्वच्छ चंद्रपूर

2. स्वच्छ भारत

3.पर्यावरण संरक्षण

4. प्लास्टीक बंदी

5. स्वच्छ हवा

6. स्वच्छ पाणी

7. रेन वॉटर हार्वेस्टींग

8. माझी वसुंधरा

9. सौर ऊर्जेचा वापर

10. बॅटरीचलित वाहनाचा वापर

11. चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव

12. मलेरिया व डेंग्यू प्रतिबंध

13. अमृत महोत्सव

14. 3R reducing, reusing and recycling Wa

ste

15. रस्ता स रक्षा

16. वाहतूक नियमांचे पालन

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here