जिल्ह्यात “प्रशासन गाव की और” मोहीमेचे आयोजन..! 19 ते 24 डिसेंबर दरम्यान राबविली जाणार मोहीम.

0
6

 

चंद्रपूर, दि. 19: केंद्र शासनाच्या संचालक, प्रशासनिक सुधार आणि लोक तक्रार विभाग कार्मीक, लोक तक्रार आणि पेंशन मंत्रालयाद्वारे गुड गव्हर्नस विक-2024 अंतर्गत “प्रशासन गाव की और” मोहीम दि. 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

 

या मोहीमेअंतर्गत 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत तालुकास्तरावर तहसिल मुख्यालय, पंचायत समित्या आदी ठिकाणी विविध शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये जनतेशी निगडीत कामकाज करण्यात येणार आहे.

 

हि आहेत जनतेशी निगडीत कामे:

 

नागरिकांनी शासकीय कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीचे निराकरण करणे. केंद्र व राज्य शासनाचे विविध पोर्टल व केलेल्या तक्रारीचे निराकरण करणे. नागरिकांशी संबंधीत विविध प्रकारचे दाखले/प्रमाणपत्रे वितरीत करणे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच विविध कार्यालयात प्रलंबित असलेल्या नागरिकांचे दैनंदिन जिवनाशी निगडीत कामकाजाचा निपटारा करणे.

 

तरी, सर्व नागरिकांनी गुड गव्हर्नस विक-2024 अंतर्गत “प्रशासन गाव की और” मोहीमेतील शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here