राजू कांबळे
तालुका प्रतिनिधी
सामुद्रपुर
समुद्रपूर दि. ११/१२/२०२४.शासनाने युवा प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढवून द्यावा।
समुद्रपूर तालुक्यातील प्रशिक्षणार्थीचे तहसीलदारांना निवेदन
शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नुकताच राबविली युवा प्रशिक्षणार्थीचा कालावधी सहा महिने आहे मात्र हा कालावधी आता शासनाने वाढवून द्यावा यासाठी समुद्रपूर तालुक्यामधील युवा प्रशिक्षणार्थी यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राज्यातील बेरोजगार यांना मानधनाची घोषणा केली व त्यांची अंमलबजावणी सुद्धा केली मात्र आता सहा महिन्याचा कालावधी संपुष्टात येणार असून पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड या प्रशिक्षणार्थी यावर येऊ नये यासाठी त्यांनी स्वतः तहसीलदार यांना अर्ज करत हा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे यावेळी तालुक्यातील शेकडो प्रशिक्षणार्थी प्रामुख्याने उपस्थित होते