मनवर शेख
तालुका ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
समुद्रपूर .नागपूर हैदराबाद रोड राष्ट्रीय महामार्ग शेडगाव चौरस्ता भागात भर धाव असलेल्या ट्रॅव्हल्स ने महिलेला चिरडून टाकले ही घटना बुधवारी दिनांक ११सकाळी ८.३० वाजता घडली मृत महिलेचे नाव सुधा माणिक झाडे वय ५७ वर्षआहे अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली समुद्रपूर चे ठाणेदार संतोष जी शेगावकर साहेब तसेच गिरड चे ठाणेदार संदीप जी गाडे साहेब यांनी आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले व तेथील जमाव बाजूला करण्यात आला या अपघाताची नोंद पोलिसांनी केली आहे व पंचनामा करून मृतदेह समुद्रपूर येथीलग्रामीण रुग्णालयात रवाना केले