वाघोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना विषबाधा.! आमदार कुणावर यांनी घेतली दवाखान्यात भेट…!

0
11

मनवर शेख 

तालुका ब्युरो चीफ 

हिंगणघाट 

हिंगणघाट:- विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा जिल्हा परिषद शाळेतील घटना एकूण 45 विद्यार्थ्यांना झाली विषबाधा आमदार समीर कुणावर यांनी बाधित विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना दिला धीर.

दि.11 डिसेंबर 2024 हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा दुर्दैवी प्रकार काल मंगळवारी उघडकीस आलाया दुर्दैवी घटनेची आमदार समीर कुणावर यांनी विशेष दखल घेत आरोग्य विभाग व शिक्षण विभागाला तातडीची मदत देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले दि.11 डीसेंबर 24 रोजी आमदार समीर कुणावार यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

यावेळी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान डॉक्टर नाईक सर हिंगणघाट पंचायत समिती विस्तार अधिकारी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर मिसार मॅडम डॉक्टर राहुलजी भोयर माननीय अपूर्वक फिरके डॉक्टर कांबळे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुजर इत्यादी अधिकारी उपस्थित होते काल दिनांक दहा रोजी वाघोली येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला त्यानंतर मुलांना उलटी मळमळ व ताप यासारखी लक्षणे आढळून आली वाघोली येथील शालेय कर्मचाऱ्यांनी बाधित विद्यार्थ्यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे तब्बल 45 विद्यार्थी हे प्रकृती अस्वस्थामुळे काल मंगळवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यातील चार विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर 41 विद्यार्थ्यावर अजूनही उपचार केला जात असल्याची माहिती मिळाली विद्यार्थ्यांनी खाललेल्या अन्नपदार्थाची चाचणी केल्यानंतर विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे पाहणी करतेवेळी भाजपा पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगरसेवक देवा पडोळे अतुल नंदा गवळी प्रमोद नवकर कर कमलाकर महाकाळकर नितीनजी वाघ इत्यादी कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here