चंद्रपूर: बाल कलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी देववाणी दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरतर्फे राज्यस्तरीय गायन, वादन, नृत्य व फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या ऑडीशन राऊंडचे आयोजन ८ डिसेंबर २०२४ रोजी चंद्रपूर येथील चोर खिडकी परिसरातील ब्राईट इंग्लिश स्कूलमध्ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.ऑडिशन राउंड साठी 200 रु शुल्क आकारण्यात आले आहे.
राज्यभरातील कलावंतांना संधी
ही स्पर्धा विशेषतः बालकलावंतांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेद्वारे त्यांच्यातील गायन, वादन (इन्स्ट्रुमेंट), नृत्य आणि फॅशन शो यांसारख्या विविध कलात्मक कौशल्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे.
अंतिम फेरीचे आयोजन १४ डिसेंबरला
ऑडीशन राऊंडमधून निवड झालेल्या प्रतिभावंत बालकलावंतांची अंतिम फेरी १४ डिसेंबर २०२४ रोजी चंद्रपूरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे भव्य स्वरूपात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
संपर्कासाठी माहिती :- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दिव्यांग कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन देववाणी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. प्रवेश व इतर अधिक माहितीसाठी मेघना शिंगरू (मोबाईल क्रमांक: ९५५२७००३८४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून बालकलावंतांना आपली कला सादर करण्याची अनोखी संधी मिळणार असून, त्यांच्या कलागुणांना नवा आयाम मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.