मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या या गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे श्री संतज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा हरिभक्त परायण भागवताचार्य किशोरीताई सांगोले श्री शेत्र आळंदी यांचा सात दिवस सतत अखंड संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ कथा सोहळा शेवटच्या दिवशी वायगाव हळद्या गावामध्ये दिंडी प्रदक्षिणा खेड्यापाड्यातून येणाऱ्या सर्व महिला व पुरुष भजन मंडळ यांचा मोठ्या उत्साहात या दिंडीमध्ये बजरंग बली हरिपाठ भजन मंडळ वायगाव हळद्या,
श्री संत सावता भजन मंडळ
वाय गाव हळद्या ,जय हनुमान भजन मंडळ वायगाव ,शिवशक्ती भजन मंडळ, माऊली महिला भजन मंडळ वायगाव आणि हरी ओम बाबा भजन मंडळ लसनपुर सर्व भजन मंडळाचासहभाग होता महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकरी वायगाव हायद्या येथील भव्य दिव्य महाप्रसादाचा कार्यक्रम शांततेत व सुव्यवस्थित पार पडला.