भगवान श्री सत्यसाई बाबाचा 99 वा जन्मोत्सव सोहळा.

0
10

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समिती व भजन मंडळात उत्साहाने खालीलप्रमाणे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.श्री. सत्यसाई सेवा समिती चंद्रपूर द्वारे दिनांक 17 नोव्हेंबर 2024 ते 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन निमंत्रण पत्रिका नुसार करण्यात आले .विविध समितीमध्ये सकाळी 5 वाजता नगरसंकिर्तन घेण्यात आले. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुख्य समिती मध्ये भगवान बाबांचे 99 भजने सकाळी 10 ते साय.03 वाजेपर्यंत सर्व समिती तर्फे घेण्यात आले. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी डेबूसावली वृद्धाश्रम, देवाडा . व दि.19 नोव्हेंबर रोजी मातोश्री वृद्धाश्रम बल्लारशा रोड चंद्रपूर येथे मेडिकल सेवा करण्यात आली. तसेच महिला डे निमित्य वृद्धाश्रमात वृद्धांना जीवनोपयोगी वस्तूंचे किट्स वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला. दि.20 नोव्हेंबर रोजी श्री सत्यसाई सेवा समिती चंद्रपूर येथे एकादश रुद्रम घेण्यात आले. दि.21 नोव्हेंबर ला उज्वल गोशाळा, लोहारा येथे गोरक्षण सेवा घेण्यात आली . दि. 22 नोव्हेंबर ला सत्यसाई सेवा समिती चंद्रपूर मुख्य समिती मध्ये बालविकास मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ 07 ते 09 यावेळेत घेण्यात आले.. दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या 99 जन्मोत्सवा निमित्य मुख्य समिती येथे सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगर संकिर्तन, श्री सत्यसाई व्रतकथा , माता महाकाली मंदिर चंद्रपूर येथे नारायण सेवा, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत भगवान बाबांच्या पालखीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. सायंकाळी 6 ते 9 वाजे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे यांचे हस्ते दीप प्रज्वलन, त्यानंतर वेद पठण, समिती कन्व्हेनर श्री. सुधाकर देवके यांचे प्रास्ताविक, सत्यसाई सेवा समिती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर मुनगंटीवार यांन चंद्रपूर संघटनेच्या कार्याचा आढावा मनोगतातून व्यक्त केला. यानंतर या कार्यक्रमासाठी आलेले विशेष अतिथी अकोला येथील श्री गोविंद महादेव मांडवे यांनी भगवान श्री सत्यसाईबाबां विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महिला तर्फे सौ. संगीता दिनेश जयस्वाल मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगर यांनी आपले भगवान बाबा विषयीचे अनुभव व्यक्त केले. अकोला येथून आलेले श्री .मधुकर लक्ष्मण डोळे यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी सेवा कार्याचे महत्व व भगवान बाबांना आवडणाऱ्या सेवा कार्याविषयी माहिती दिली. मानव सेवा हीच माधव सेवा हे भगवान बाबांची ब्रीदवाक्य यावर त्यांनी मार्गदर्शन केले मेडिकल सेवा, नारायण सेवा, ग्रामसेवा, साधना शिबिर, बालविकास, माता बाल संगोपन, प्रेम तरु प्रोजेक्ट या अंतर्गत वृक्षांचे लागवड व संगोपन असे विविध कार्या विषयी त्यांनी माहिती दिली. यानंतर भगवान श्री सत्य साईबाबा यांचे प्रोजेक्टर वर प्रवचन व भजन दाखविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पाळणा गीते,बर्थडे गीत,आरती व महाप्रसादाने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जयस्वाल व सत्यम जयस्वाल यांनी केले.

तसेच ब्रम्हपुरी समिति मध्ये प्रमुख पाहुणे श्री सी.एच . जाधव महाराष्ट्र राज्य पूर्व सेवा समन्वयक यांची उपस्थिती लाभली व सर्व साई भक्तांना मार्गदर्शन केले. तसेच दिं. 22/11/2024ला भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 46 रक्त दात्यानी रक्तदान केले. ही सर्व सेवा साई चरणी अर्पण

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here