चंद्रपूर: स्त्री तारीनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला .याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. विणा बोरकर गाडगे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले व संविधान दिवसाचे महत्त्व सांगितले तसेच सौ. वंदनाताई मनपे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव करून दिले. कार्यक्रमाकरिता दुर्गापूर वार्ड नंबर ४ येथील वसाहतीतील महिला व बालक उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त गरीब व गरजू मुलांना वह्या , पेनी आणि चॉकलेट वितरित करण्यात आले. त्यावेळेस स्त्री तारिणी बहुउद्देश संस्थेचे सचिव सौ.अंजलीताई मेश्राम , सौ.पपीता तामगाडगे,सौ. रूपाली चालखुरे, नीलिमा पाटील, स्वाती नगराळे, लक्ष्मी तावाडे, समता अवतरे, सुनिता टेंभुर्णे, लक्ष्मी जैन, बेबी भालेराव, श्वेता बनसोड उपस्थित होते.