शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळाल्याने चंद्रपुरात जल्लोष..! मा.ना. एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, हीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची आशा.

0
11

 

चंद्रपुर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला नेत्रदीपक यश मिळाले तर महाविकास – आघाडीला दणदणीत पराभवाला समोर जावे लागले असून महायुतीने 288 पैकी – तब्बल 234 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यात भाजपा 132, शिवसेना 57 तर अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. हा अनपेक्षित विजय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीला मिळाला असून मा.ना. एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, हीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची आशा.

 

तसेच चंद्रपुर जिल्ह्यामध्ये महायुतीने दिलेले भाजपाचे सहा उमेदवारांपैकी पाच उमेदवार विजयी करण्यास चंद्रपुरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे आज हे यश महायुतीला सत्ता स्थापन करण्यास खारिचा वाटेचे योगदान दिले आहे.

 

शिवसेना व महायुतीचा यशाबद्दल विजयी जल्लोष व शिवसेना मुख्यनेते मा.ना. एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, ही अपेक्षा करीत शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात तुकुम येथे ढोलताशा, फटाके व मिठाई वाटप करुन विजयोत्सव साजरा करण्यात आला.

 

यावेळी चंद्रपुर युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझळकर, चंद्रपुर युवासेना महानगर प्रमुख दिपक रेड्डी, चंद्रपुर उप महानगर प्रमुख विशाल कावने, वाहतुक उप तालुका प्रमुख विक्की महाजन, उर्जानगर विभाग प्रमुख मुक्कदर बावरे, आशिष गोमासे, मनोज खांडेकर, मंगेश उइके,वैभव सोनकुसरे, राजू रायपुरे, मनिष रामटेके, हिरामन बावणे, मनोज तांडेकर, संतोष आंबिलकर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here