जीवरक्षक फाऊंडेशन चे कर्तृत्वाला सलाम अजगर ला दिले जीवनदान.

0
10

 

युसुफ पठाण 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी  

हिंगणघाट : नजिकच्या गव्हा या गावात चक्रवर्ती लोखंडे यांच्या घरी दि.२१नोव्हेबर २०२४ ला १० वा दरम्यान अंगणात विशालकाय अजगर आढळून आला या वेळी भितीचे वातावरण निर्मिती झाली होती..सदर माहिती त्यांनी जीवरक्षक फाउंडेशन हिंगणघाट ला दिली असता घटनास्थळी सर्पमित्र भाविक कोपरकर व सहकारी अनिकेत खडसे व नीरज मुसळे यांनी जाऊन सुरक्षितपणे त्याला पकडले. त्याची लांबी ७ फूट अशी आहे.त्यांनी सांगितले की हा भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो.

घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. अजगराला आपल्या आकाराच्या आणि ताकदीनुसार आपले शिकार गळफुसळ करून मारता येते. अशी माहिती त्यांनी घटनास्थळी सांगितली व वनविभाग कर्मचारी दिपक वैरागडे व योगेश पाटील यांच्या उपस्थितीत त्याला जंगलात सोडण्यात आले. यावेळी वन्यजिवरक्षक राकेश झाडे व सर्पमित्र करण विटाळे देखील उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here