समाजाची नि:स्वार्थ सेवा हे ईश्वरीय कार्य*.! ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन; दुर्गापूर येथे अध्यात्मिक संजीवन सभा.!

0
15

 

चंद्रपूर, दि. 3: गरीब आणि उपेक्षितांची सेवा करण्यासारखा मोठा धर्म कोणताच नाही. सर्व जाती-धर्म मानवता या एकाच धर्माने बांधले गेले आहेत. येथील गरीब व कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी जीव तोडून कार्य केले. नि:स्वार्थ सेवा हे ईश्वरीय कार्य आहे असे मी मानतो. त्यामुळे मानवसेवेसाठी प्रत्येकजण पुढे आला तर समाजाची प्रगती साधता येईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

 

दुर्गापूर येथे अध्यात्मिक संजीवन सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ‘गरिबांची सेवा करणे पुण्याचे कार्य आहे. मी शेवटच्या घटकातील गरिबांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. गरीब, कष्टकऱ्यांसह सर्व जाती-धर्मातील नागरिकांची सेवा करण्याकरिता मी कटीबद्ध आहे. त्यांच्या सर्वागींण विकासासाठी सर्व शक्तिनिशी उभा राहील.’

 

मी गरीब व कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी जीव तोडून कार्य केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात. गरिबांचे ऑपरेशन केले. जीवनामध्ये जात, पात, धर्म न पाहता गरीबांच्या कल्याणासाठी कार्य केले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

 

ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘दुर्गापुर क्षेत्रात विविध विकासकामे करण्यात आली. अपूर्ण कामे लवकरच पूर्णत्वास येतील. जाती-पातीच्या नव्हे तर समतोल विकास व कार्याच्या आधारावर समोर जायचे आहे. यापूर्वी येथील सेंट मायकल चर्चला 58 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या क्षेत्रातील दुर्गापुर, नेरी, पायली, भटाळी, ऊर्जानगर येथील बेघरांना येत्या पाच वर्षात स्वतःच्या हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल.’

 

बेरोजगारांसाठी रोजगाराची व्यवस्था

 

चंद्रपुरातील सुपर थर्मल पावर स्टेशन येथे ऊर्जा निर्मितीचा 8 व 9 क्रमांकाचा संच उभारण्याचे काम झाले आहे. 800 मेगावॅट विद्युत निर्मिती संच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोंभुर्णा तालुक्यात सर्वात मोठी इंडस्ट्री उभी राहत असून येथे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय करण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here