सृदृढ भावी पिढी घडविण्यात योग नृत्य परिवाराचे महत्वपूर्ण योगदान – आ. किशोर जोरगेवार..! योग नृत्य परिवार च्या वतीने दिपावली संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन.

0
16


चंद्रपूर:- प्रत्येकाची जीवनशैली वेगाने बदलत आहे. रोजच्या दगदगीतून, मानसिक तणावातून दूर राहताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचे ठरले आहे. त्याच्याच अनुषंगाने योग, ध्यान आणि संगीताची साथ आपल्या शरीर व मनाला शांती प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. अश्या आयोजनातून योग नृत्य परिवार समाजाला जगण्याची नवी दिशा देत असून सुदृढ भावी पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण काम आपल्या वतीने होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
योग नृत्य परिवारच्या वतीने आझाद बागेत दिपावली संगीतमय पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी योग नृत्य परिवाराचे जनक गोपाल मुंदडा, पतंजलीचे विजय चंदावार, गोपाल मुंदडा, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सुरेश घोडके, किशोरी हिरुडकर, प्रकाश गुंटेवार, धनंजय तावाडे, रवी लोणकर, सोनाली आंबेकर, नार्सो पोलसवार यांच्यासह योग नृत्य परिवाराचे अनेक सदस्य व गार्डनमधील संपूर्ण ग्रुप उपस्थित होता.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, योग नृत्य परिवाराचे माझ्याशी नेहमी स्नेहपूर्ण संबंध राहिले आहे. आपल्या प्रत्येक कार्यक्रमात आपण मला आवर्जुन आमंत्रीत करता. योग नृत्य परिवारच्या वतीने शहरातील प्रत्येक भागात शाखा सुरु करत समजाला मानसिक आणि शारिरिक तणावातून मुक्त करण्याचे दिशेने यशस्वी पाउल टाकले आहे. मी सुध्दा अनेकदा आपल्या योगा शिबिरांना भेट घेत योग साधना करण्याचा आनंद घेतला आहे. त्यातून मिळणारी उर्जा नवि चेतना देत असते.
योगा गृप वाढावे यासाठी आमचे नेहमी प्रयत्न राहिले आहे. शक्य ती मदत आपण या गृपला आजवर करत आलो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये संगीताच्या सुरांमधून आपल्याला एक नवीन उर्जा मिळेल, नविन सकारात्मक विचारांची निर्मिती होणार असून योग नुत्य परिवाराकडून सुरु झालेली ही एक उत्तम सुरुवात होणार असल्याचे ते यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी योग नृत्य परिवारच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here