लोकनेते विकास पुरुष ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर तालुक्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मौजा चांदसूर्ला (खैरगाव) येथील काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंदेलसिह चंदेल, प्रमोद कडू, अनिल डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष अर्जुन नागरकर यांची उपस्थिती होती. प्रवेशाचे मुख्य कारण लोकसभा निवडणुकीला पाच सहा महिने लोटून काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांनी ज्या युवा कार्यकर्त्याना आश्वासने देऊन जी स्वप्ने दाखविली होती,
त्याची कुठेही पूर्तता होताना दिसता नसल्यामुळे नाराज काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला प्रवेश घेणाऱ्या मधील जयेंद्र ताजने, बबलू आत्राम, सतीश हेलवडे विजय गौरकार, नितीन ढोके, अतुल हेलवडे, चंद्रकांत दातारकर, लक्ष्मण नागरकर, रवी हेलवडे यांची उपस्थिती होती.