चंद्रपूर:- सकाळी 9 वाजता महाआरतीने कार्यक्रमांना सुरुवात होईल. नंतर गायत्री परिवाराच्या वतीने शक्ती संवर्धन व पर्यावरण संरक्षण महायज्ञ होणार आहे. तर सायंकाळी 4 वाजता महाकाली मंदिर येथून श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीला प्रारंभ होणार असून यात “मुझे चढ गया भगवा रंग” या गाण्याच्या गायिका शहनाज अख्तर यांचा रोड शो असणार आहे.
बॉक्स भिक्खु संघाच्या वतीने अम्माच्या प्रकृतीसाठी प्रार्थना
सध्या वर्षवासाचा पवित्र महिना सुरू आहे. त्या निमित्ताने महाकाली महोत्सवात भिक्खु संघाला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांना चिवर व फळदान करण्यात आले. भिक्खु संघाने अम्माच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाचे सचिव पूज्य भदंत महाथेरो सुमणवंन्नो, महाथेरो नागदीपंकर, संघवंश थेरो, आनंद थेरो, प्रज्ञानंद, गनानंद आदींची प्रमुख उपस्थिती होती.