स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विध्यार्थी यांनी गोंडवाना विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धेत विजय संपादन केले आहे. नुकतेच गोंडवाना विद्यापीठा द्वारे आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या मध्ये मुलींच्या बुद्धीबळ स्पर्धेत मुलींच्या चमुने द्वितीय स्थान पटकावून विजय संपादन केले.तिहेरी उडी स्पर्धेत कु. रोहिणी रडके या विद्यार्थिनीने द्वितीय स्थान मिळविले आहे. मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने विजय प्राप्त करून प्रथम स्थान मिळविले आहे. या विद्यापीठ स्तरीय मुलांच्या टेबलं टेनिस स्पर्धेत विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी द्वितीय स्थान तर मुलींच्या चमुने तिसरे स्थान पटकाविले आहे.
या सर्व विजयी विदयार्थ्यांन चे महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. विधी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट सहभाग देऊन विजय संपादन केल्या बद्दल विद्यार्थ्यांनी डॉ. दत्ता यांचे मनः. पूर्वक आभार मानले. सर्व विजेत्यांचे महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.