आज दिनांक 05/10/2024 रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने WCL एकोणा येथील क्षेत्रीय महाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले. या निवेदना द्वारे माढेळी रोडवर WCL कंपनीकडून अवैध रित्या करण्यात येत असलेल्या वाहन पार्किंगमुळे स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या अडचणी आणि अपघातांची वाढलेली संख्या याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, या अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याशिवाय, रोजच्या जळ वाहतुकीमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या आणि इतर आजारांचा सामना करावा लागत आहे.
आम आदमी पार्टीने मागणी केली आहे की, WCL प्रशासनाने तात्काळ या समस्येचे निराकरण करावे आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. या संदर्भात त्वरित कारवाई न झाल्यास जनतेच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपलशेंडे, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, वरोरा शहर अध्यक्ष बंटी खडके, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.