आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आणि जिल्हा अॅथलेटिक संघटना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने माता की एकता दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी सकाळी सहा वाजता गांधी चौक येथून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील 1000 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
या स्पर्धेत 51,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक, 31,000 रुपयांचे द्वितीय पारितोषिक, 21,000 रुपयांचे तृतीय पारितोषिक, 11,000 रुपयांचे चतुर्थ पारितोषिक आणि 5,000 रुपयांचे पाचवे पारितोषिक देण्यात येणार आहे. दौड गांधी चौक, जटपूरा गेट, रामनगर, जनता कॉलेज, लखमापूर हनुमान मंदिर, बापट नगर मार्गे बंगाली कॅम्प, बायपास, अष्टभुजा, हिंग्लाज भवानी, राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज मार्गे माता महाकाली मंदिर होत पुन्हा गांधी चौक येथे दाखल होऊन ही स्पर्धा समाप्त होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील अनेक उत्तम धावकांनी सहभाग घेतला आहे,