महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी – बारावी परिक्षा शुल्कात वाढ केली आहे. परिक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, रनर, लिपीक, पर्यवेक्षक तर उत्तरपत्रिका तपासणारे मुख्य नियामक, नियामक व परिक्षक चोखपणे आपली जबाबदारी पार पाडीत असतात. तेव्हा परिक्षा केंद्रावरील व उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी अध्यक्षांकडे केली. याआधी देखील या मागणीसाठी पत्रव्यवहार केला होता. यावर मा. अध्यक्ष यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन मानधन वाढीबाबत निर्णय घेऊ, असे सकारात्मक उत्तर दिले. सोबतच विद्यार्थी, शिक्षकांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
मंडळामध्ये निवडून आल्यानंतर आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी पहिल्यांदा भेट दिल्याबद्दल अध्यक्ष श्री. शरद गोसावी यांनी शाल, पुस्तक भेट देत सत्कार केला.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, भंडारा जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, बंडू बिजवे उपस्थीत होते.* 📚🌷📚
#stateboard #pune #office
#student #maharashtra
https://www.instagram.com/p/C_XiARlzbZp/?igsh=bDA1am05Z2J2NGhj