भाजप कामगार मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे.! यांनी पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सुदर्शन मुमक्का यांना निवेदन देऊन बल्लारपूरच्या टेकडी विभागात *पोलीस चौकी* बांधण्याच्या मागणीचे निवेदन दिले.मागील वर्षी पण तत्कालीन एसपी ला दिले होते. एस पी नीं पोलीस चौकीचा विषय आम्ही आमच्या आराखड्यात समाविष्ट आहे.जागा निवडून लवकरच काम सुरू करू, असे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे शहरातील जवळपास निम्मी लोकसंख्या टेकडी परिसरात राहते, त्यातही बहुतांश गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, मात्र सर्वच पोलीस चौक्या महामार्गावर असल्याने मदद कामाला विलंब होत असते. मदतीसाठी पोलिस तातडीने पोहोचू शकत नाही, पोलिस चौकी उभारल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळेल, तर गुन्हेगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होईल.