जिवती-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल से जल या योजनेची घोषणा केली. 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवण्यात येईल, असे सांगितले आणि जल जीवन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 29 सप्टेंबर 2019 रोजी देशातीलसर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पत्र पाठवून हि योजना सामाजिक स्वास्थ्याकरीता राबविण्याचे आवाहन केले.मात्र जिवती तालुक्यातील जलजिवन मिशन योजनेचा बट्याबोळ झाला आहे. या योजनेत प्रत्येक वेक्तीमागे 55 लिटर पाणी देता येईल, असे नियोजन करायचे होते.लोकस्खेनुसार तेवढ्या क्षमतेच्या पाण्याची टाकिचे (जलकुंभ) बांधकाम करायचे होते. देशभरात या योजनेचा मोठा गाजावाजा झाला मात्र जिवती तालुक्यात अजुनही पाण्याच्या टाक्या अर्धवटच आहेत व काही ठिकाणी बांधल्या नाहीत आणि दरडोई 55 लिटर पाणी मिळत नाही तालुक्यातील अनेक ठिकाणी घराघरात नळजोडणी करण्यासाठी करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेले सिमेंटचे पक्के रस्ते फोडून ग्रामीण भागात रस्त्यांची वाट लावली आहे.या योजनेची कामे अपूर्ण ठेवल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकायची वेळ ठेकेदारांनी आंनली आहे. तर शासनही कामासाठी निधी देतं नसल्याने कामं करुन घेण्यास ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हतबल ठरत आहे. जिवती तालुक्यांत या योजनेत, *88 कोटींची ,147 कामे मंजूर आहेत* त्यापैकी एल.डी.कंट्रक्शन,च्या ठेकेदाराला. येल्लापुर, शेडवाई, कोदेपुर, चिखली-खु-लमांनगुडा , सेवादासनगर, कमलापुर,दमपुरमोहदा, देवलागुडा, गडपांढरवणी, घनपटार, करमकोंडी, रोडगुडा, लांबोरी, लिंगडोह, मरकलमेटा-सोमलागुडा, नारपठार, नोकेवाडा, परमडोली-तांडा, पिटीगुडा, टेकामांडवा-गोलेवारगुडा, येरमीयेसापुर, चिनुपाटिलगुडा,सोनेरावगुडा, सर्वाधिक कामे सोपवली आहेत, व गंगाईकंट्रक्शन, च्या ठेकेदाराला सुध्दा एकुण २० कामे सोपवली आहेत, त्यातिल सर्वच कामे, अर्धवट असुन, थोडक्यात कामे झाले आहेत त्या, कामाची योग्य चवकशी करून कारवाई करावी,
◾-88 कोटींची 147कामे मंजूर आहेत त्यापैकी, 66 कामांचे, एक टप्प्यात, दोन टप्प्यांत बिले मिळाले आहेत, बिल्ले मिळालेली 66 कामे निकृष्ट असुन बिल्ले, कोणत्या. समिकरणाद्वारे शासनाने कंत्राटदाराला दिले यांची योग्य चवकशी करून कंत्राटदार व अधिकार्यांंनवर कार्यवाही करण्यात यावी.