गवराळा प्रभागात राशन वाटप केंद्र सुरू करण्यासाठी आम आदमी पार्टी कडून तहसीलदारांना निवेदन…! गरीब मजूर वर्गाला होणारा त्रास तत्काळ दूर करा अन्यथा आंदोलन करू :- युवा नेते सुमित हस्तक.

0
22

 

 

दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या मार्गदर्शनात, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार यांच्या नेतृत्वात गवराळा प्रभागात राशन वाटप केंद्र सुरू करण्यासाठी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात, गवराळा प्रभागातील लोकांना व तालुक्यातील चिरादेवी, ढोरवासा व अनेक गावातील नागरिकांना राशन मिळवण्यासाठी 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. सध्या राशन घेण्या करिता लोकांना भद्रनागमंदिर जवळ लोकमान्य शाळे समोर जहावे लागतो जे की लोकांना दूर पळतो, ही गैरसोय लक्षात घेऊन गवराळा प्रभागात योग्य ठिकाणी नवीन राशन वाटप केंद्राची मागणी करण्यात आली आहे.

 

शहरातील व तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे राशन मिळवण्यासाठी होणारी ही त्रासदायक परिस्थिती सोडविणे गरजेचे आहे. या निवेदनाद्वारे आम आदमी पार्टी चे युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार यांनी तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की, या भागातील लोकांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरित राशन वाटप केंद्र सुरू करण्यात यावे.

 

आम आदमी पार्टी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी सांगितले की, या मागणीमुळे ग्रामीण भागातील लोकांना, वृध्द व अपंग लोकांना व तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यांना आवश्यक अन्नधान्य सहज उपलब्ध होईल. या निवेदनाद्वारे प्रशासनाला लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. अन्यथा तहसील कार्यालय समोर जनआंदोलन उभे करू अशी चेतावणी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी केली आहे.

यावर तहसीलदार साहेब यांनी या मांगणीची गभिर्यानी दखल घेतली असून यावर उपाययोजना करून लवकरच पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, चंद्रपूर महिला अध्यक्षा ॲड. तब्बसूम शेख, राकेश कोवे, दिनेश चिंचोलकर, अक्षय आस्कर, सुमित बारतीने, सौरभ बेताल, लकी निखाडे, रोहित तेलसे, प्रशांत बाळगू व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here