नृत्य हा एक दिव्य संस्कार आहे. हा संस्कार मनाला शांती देतो, देहाला शिस्त लावतो व आराधनाच्या माध्यमातून परमेश्वराकडे आपली कला पोचविण्याचे सामर्थ्य देतो. पूनम झा यांनी गेली अनेक हा संस्कार विद्यार्थिनींमध्ये रुजवीला आहे. मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते असे प्रतिपादन संस्कार भारती चंद्रपूर च्या अध्यक्ष संध्या विरमलवार यांनी केले.
नृत्यधारा कथक विद्यालय चंद्रपूरच्या गुरुपौर्णिमा उत्सवात सौ विरमलवार बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी या नात्याने
डॉ. गोपाल जी मुंधड़ा, डॉ. राम भरत, ऍड.श्री शंकर सागोरे, श्री अजय धवने , श्री आशिष देव, श्री हनुमान आसेकर, कथा वाचक श्री विनायक धोटे, सौ. मुक्ता बोझावर, श्री जावेद, श्री जगदीश नंदूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी नृत्यधारा कथक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वैविध्यपूर्ण सादरीकरणाच्या माध्यमातून गुरु श्रीमती पूनम झा यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सर्व प्रस्तुतीनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 6 वर्षे वयाच्या विद्यार्थिनीं पासून 55 वर्षे वयाच्या विद्यार्थिनींनी कलाविष्कार सादर करत कलेला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले. यावेळी उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी श्रीमती बिंदू गिरीश गुप्ता यांना स्व. चंद्रभूषण झा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नृत्य सादरीकरणात संस्कृति झा, पावनी गेडाम, लतिका गेडाम, अंजली सिंह, स्वरा पाचघरे, गायत्री त्रिनगरीवार, माही बडवाई, त्रिशा पाठक, आराध्या शेडमाके, भूमी साव, साहिरा, आश्वी, सौ. निभा सरकार, सौ. सुमन त्रिपाठी, सौ. पद्मा शर्मा, सौ. किरण गडकर व अन्य शिष्यानी सहभागी होत मनमोहक प्रस्तुती सादर केल्या.मंच संचालन कु. संस्कृति झा और कु. लतिका गेडाम यांनी केले.कार्यक्रमात तबल्यावर सुधीर मंदाडे, हार्मोनियम वर मुकेश मंदाडे, की-बोर्ड वर प्रवीण ढगे, व गायनात दिशा लाकड़े आणि अश्विनी नंदेश्वर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.पालकांमध्ये सौ. सीमा झा आणि श्री गेडाम यांनी नृत्यधारा कथक विद्यालयाचे आणि संचालिका श्रीमती पूनम झा यांचा कौतुकोल्लेख करत आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री महेश कानपल्लीवार, श्री सुभाषचंद्र झा, श्री गिरीषचंद्र गुप्ता, श्री आनंद झा आणि आशीष झा यांनी विशेष परिश्रम घेतले.