दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने नगर परिषद भद्रावती येथे निवेदन देण्यात आले. शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे परंतु नगर परिषद भद्रावती द्वारा कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. मच्छर किट नाषक ची कोणत्याही वॉर्ड मधे आतापर्यंत फॉगिंग सुद्धा करण्यात आले नाही ज्या मुळे सामान्य नागरिकांचा जीवावर धोका निर्माण होत आहे. मच्छरांचा वाढत्या प्रभावा मुळे डेंग्यू चा आजाराचा प्रादुर्भाव जोमाने वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याच समस्या गृहीत धरून नगर परिषद भद्रावती येथे मुख्याधिकारी मॅडम यांना भेट देण्याकरिता आम आदमी पार्टी चे शिष्ट मंडळ गेले असता.
मुख्याधिकारी मॅडम अनुपस्थित असल्यामुळे उपमुख्याधिकरी गायकवाड साहेब यांना भेट दिली व त्यांना सध्याची शहरात डेंग्यूच्या आजाराची भयावह परिस्थिती बद्दल जाणीव करून देण्यात आले व त्यांना सांगितले की नगर परिषद द्वारा अजूनही मच्छर किट नाषक फवारणी करण्यात आलेली नाही ज्या मुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आदी आजाराचा प्रकोप सुरू झालेला आहे. परंतु नगर परिषद द्वारे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आले नाही. तत्काळ या विषयाची दखल घेऊन येत्या 7 दिवसात यावर अंमलबजावणी करा अन्यथा आम आदमी पार्टी च्या वतीने समस्थ नागरिकांना घेऊन नगर परिषद भद्रावती समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा यांनी दिला.
त्यावर उपमुख्यधिकारी गायकवाड साहेब यांनी निवेदन स्वीकार करत सांगितले की, फोगिंग मशीन बंद असल्यामुळे आतापर्यंत शहरात फोगींग सुरू करण्यात आलेली नाही परंतु येत्या 2 दिवसात फोगींग सुरू करण्यात येईल व डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या आजाराशी कसे निपटावे या करिता प्रचार – प्रसार करून नागरिकांना या विषयी जागरूक करू. यावेळी आम आदमी पार्टी वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, राजकुमार चट्टे, सरताज शेख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.