चंद्रपूर/ पायली भटाळी:- प्रत्येक वर्षा प्रमाणे या वर्षी शाळेचे मुख्याध्यापक श्री निखिल तांबोळी यांचे नेतृत्वात ७८ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यामध्ये संपूर्ण गावातून सर्वप्रथम प्रभातफेरी काढून तदनंतर राष्ट्रध्वजाचे राष्ट्रगीत, राज्यगीत -अन् जय जय महाराष्ट्र माझा गर्जा जयजयकार करत ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर सर्व मान्यवर, नागरिक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात काही चिमुकली विद्यार्थी तथा प्रमुख अतिथी सरिता मालू यांचे मार्गदर्शन खाली भाषणे देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. तसेच फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप चे अध्यक्ष व टीम द्वारे शाळेला आवश्यक असलेले दोन व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले. सोबतच गावातील प्रतिष्ठित नागरीक श्री मिथुन रामटेके यांनी शाळेच्या वाचनालाय करिता गोष्टींची पुस्तके भेट दिली.
या प्रसंगी विशेष उपस्थित म्हणून फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप च्या अध्यक्षा मा. सरिता मालू आणि पत्रकार मा. करण कोलागुरी आवाज 24 न्यूज चे मुख्य संपादक, सामाजिक कार्यकर्ते मा. गणेश इसनकर, मा. हेमा व्यास, मा. मीना जोया तसेच ग्राम पंचायत पायली भटाळी चे सदस्य मा.नदीम रायपुरे, मा. शारदा मेश्राम आणि शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मा.इंदू रामटेके यांचे सोबतच मोठ्या संख्येने गावातील नागरिक व युवा वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री निखिल तांबोळी यांनी तर आभार प्रदर्शन सहा. शिक्षिका सौ अंजलीना साळवे यांनी केले.