महिलांना या देशात सन्मानाचे स्थान संविधाना मुळे मिळाले आणि म्हणूनच आजच्या या पवित्र दिनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक थोर पुरुषाला आठवण करताना महिलांना अधिकार,समानता,सन्मान बहाल करून मानसिक गुलामीतून स्वातंत्र्य करणाऱ्या डॉ आंबेडकर यांना आठवण करण्याचा हा दिवस म्हणून साजरा करण्यात आला,बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग या छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांना पाहता आले,वेगवेगळ्या प्रसंगाचे या छायाचित्रांचे संकलन व जतन गेल्या वीस वर्षांपासून रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर सुर्यप्रकाश भगत करीत आहेत,
या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन आदरणीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले ,व प्रमुख पाहुणे म्हणून रामू तिवारी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी,सोहेल शेख,ऍड वैशाली टोंगे, प्रवीण पडवेकर,सागर खोब्रागडे,सुधाकर आंबोरे,दौलत चालखुरे,प्रा.इसदास भडके, प्ररोमिता गोस्वामी,आशिष मशिरकर,व अन्य मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी खोब्रागडे व संचालन ऍड प्रीती शाह यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सुरज कलम,कपिल भगत,कबीर,मुन्नी बाजी,सुरेखा चिडे,शोभा निरंजने, रागिणी भरणे,यांनी अथक प्रयत्न केले.