युवक दिनाच्या अवचित्यावर मातोश्री कुणावर महिला विद्यालय हिंगणघाट येथे इनरव्हील क्लब ऑफ हिंगणघाट द्वारे मेंटल हेल्थ अवेअरनेस कॅम्पचे आयोजन.

0
16

सौ.शीतल तिवारी 

हिंगणघाट तालुका प्रतिनिधि 

 

हिंगणघाट: इनरव्हील क्लब हिंगणघाट हा समाज हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम समाजामध्ये राबवित असतो. सन 2024, 25 करिता डॉ रूपल कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली इनरव्हील क्लब ऑफ हिंगणघाट विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जोपासनेच्या दृष्टीने अथग प्रयत्न करीत आहे. सतत वेगवेगळ्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्य करिता कार्यशाळेचे आयोजन करून समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.

आज युवा दिनाच्या अवचित्यावर समाजातील युवा वर्ग सुरक्षित राहावा म्हणून समाजामध्ये आधुनिकतेच्या नावावर सुरू असलेल्या चुकीच्या पद्धती पासून स्वतःची सुरक्षितता कशी करावी या दृष्टीने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन मातोश्री कुणावर महिला महाविद्यालय येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ नयना शिरभाते ( तुळसकर) यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षितते संदर्भात मार्गदर्शन करून पोक्सो कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक डॉ. रेखा नानवटकर यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रकाश टाकत, सुदृढ शरीराकरिता सुदृढ मन असणे आवश्यक असते, हे विविध प्रसंग व उदाहरणादाखल पटवून दिले. डॉ. रुपल कोठारी यांनी मातोश्री कुणावर कॉलेजने विद्यार्थ्यांच्या सेवेची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले,

तर इनरव्हील क्लबच्या एडिटर संगीता गडवार व उपाध्यक्ष कुमुद व्यास यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता मातोश्री कुणावर कॉलेजच्या उपप्राचार्य सपना जयस्वाल, ब्रिलियंट स्कूलचे प्राचार्य श्री अभय दांडेकर तसेच शाळेतील संपूर्ण प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here