गडचांदूर: भारतात विविध संस्कृती आहेत या सर्व संस्कृतीमध्ये भारतातील आदिवासीं संस्कृती ही फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेली व्यापक दृष्टिकोनाची निसर्गपूजक अशी श्रेष्ठ संस्कृतीअसून अनुकरणीय असल्याचे मत प्रा. डॉ . राजकुमार मुसने यांनी व्यक्त केले. युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील अडचंदूर येथे जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात बोलत होते .अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर घोटे होते .यावेळी प्र. पल्लवी एकरे , प्रा.डॉ.प्रशांत सरकार, प्रा.एकता गेडाम प्रा. मनीषा उघाडे, गुंजन शेंडे ,प्रतीक मून उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. राजकुमार मुसणे यांनी आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरा, नृत्यनाट्य ,आदिवासी क्रांतिकारक, आदिवासींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील एम. ए .ची विद्यार्थिनी रूपाली टेकाम हिने तर प्रास्ताविक गणेश साळुंखे याने तर उपस्थितांचे आभार मयुरी कोल्हे हिने मानले.