चंद्रपुर / बामणी:- मृत्यू हा अटळ असतो. त्याचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. नुकताच श्रीमती रमाताई शरद बरडे वय 76 यांचा दीर्घ आजाराने बामणी येथे मृत्यू झाला. त्या अंगणवाडीच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी मनःपूर्वक जोपासली व ते दायित्व मृत्यू समयी पर्यंत निर्धाराने पार पाडले. आईच्या पार्थिव शरीरास खांदा मुलींनी द्यायचा असे चारही मुलींनी ठरवले. आई-वडिलांना मुलं असो वा मुली ह्या सारख्याच असतात मनीषा, अभिलाषा, माधुरी, सुनीता या चार बहिणीने समोर येऊन आईला खांदा द्यायचा निर्णय घेतला. व दुःखद अंतःकरणाने खांदा दिला. रमाताई या सरल फाउंडेशन, पर्यावरण संवर्धन विकास समिती. तसेच मायेची सावली ज्येष्ठ नागरिक संघ बामनी च्या सक्रिय सदस्य होत्या आईने केलेल्या सेवा कार्याचा प्रभाव मुलीवर होताच तोच वसा घेऊन त्यांच्या मुली सामाजिक कार्य पुढे चालवीत आहे व पारंपारिक चालत असलेल्या परंपरेला फाटा देत आईच्या पार्थिवाला खांदा देण्यात आला.