सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प वित्त मंत्री निर्मला सितारमण यांनी सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच घेरले. काल चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील सभागृहात अर्थसंकल्पावर भाषण देत मोदी सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले याकडे लख वेधले.
खासदार धानोरकर यांनी आपल्या भाषणा दरम्यान महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात सावत्र वागणूक मिळाल्याची खंत देखील व्यक्त केली. त्यासोबतच शेतकरी आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचे देखील सांगितले. 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी देखील सभागृहात केली. शेतकऱ्यांच्या शेतमाला ला हमीभाव मिळावा यासाठी देखील प्रयत्न करावे अशी मागणी केली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पूर परिस्थितीच्या संदर्भाने देखील सभागृहात चर्चा करुन तात्काळ मदतीची मागणी केली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र सरकार ने सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या बी-बियाणावर व साहित्यांवर लावलेला जीएसटी चुकीचे असल्याचा घणाघात देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. नीट मधील पेपर फुटीच्या प्रकरण व आस.ए.एस. अधिकारी पुजा खेडेकर यांच्या संदर्भाने देखील सभागृहाचे लक्ष वेधले. जातनिहाय जणगणना करावी अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा केंद्र सरकार ने सोडवावा, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगाराचे आमिष दाखवून सरकार ने युवकाची दिशाभूल केल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. देशात महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारासंदर्भात सरकार ला चांगलेच धारेवर धरले. कोळसा खाणी संदर्भात प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल्याची मागणी देखील अर्थसंकल्पावरील भाषणात केली. या सोबतच भारत जोडो यात्रे संदर्भात राहुल गांधीनी इतिहास घडविल्याचे वक्तव्य देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सांगितले.