चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीवर ठोस उपाय योजना करा – खासदार प्रतिभा धानोरकर…! गृह मंत्री अमित शाहा यांची घेतली भेट.

0
15

 

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जंगलराज संपुष्टात यावे, अवैध धंद्यांमुळे वाढणारा अग्नीशंस्त्रांचा वापर यावर नियंत्रण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारी वर चर्चा करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गृह मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. वारंवार होणाऱ्या गोळीबारीच्या घटना व निरपराध नागरीकांचे गेलेले जीव यावर देखील खासदार धानोरकर यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार ला आदेश द्यावे, अशी विनंती देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

 

तसेच देश प्रगतीच्या दिशेने जात असतांना डिजिटल वर्ल्ड हि संकल्पना समोर आल्याने अनेकजन ऑनलाईन च्या माध्यमातून खरेदी करत असतांना दिसत असतात. हळूहळू सर्व व्यवहार मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये करत असतांना त्यातून ऑनलाईन फसवणूकीच्या घटना घडत आहेत. धावपळीच्या काळात अनेकजन मोबाईल च्या माध्यमातून आपले व्यवहार पार पडत असतात. परंतु याचाच फायदा घेऊन अनेकांना ऑनलाईन फसवणूकीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यासह देशात अनेक गुन्ह्यांची नोंद देखील झाली आहे. अनेक ग्राहकांना चुकीचे कारण सांगुन ओटीपी मागुन ऑनलाईन फसवणूक केली जाते. देशभरात जाने. 2024 ते एप्रिल 2024 या काळात 1750 करोड रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून या संदर्भात 7 लाख 40 हजार तक्रारी प्राप्त झाल्या असल्याकडे खासदार महोदयांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 

या संदर्भात दोन्ही विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेणार असल्याचे गृह मंत्री अमित शाहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here