चंद्रपूर:- विसापूर रेल्वे अंडरपास चौथ्या रेल्वे लाईनचे कामामुळे रेल्वे गेट क्र45 जवळ ग्रामस्थंच्या आवागमनासाठी अप्रोच रोड अथवा गेट ज. 45 पुर्ववत सुरु ठेवण्याच्या मागणीसाठी विसापूर वासीयांनी 6 जुलै 2024 ला रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंडल रेल्वे प्रबंधक, मध्य रेल नागपूर यांचे कडे पत्राचार व चर्चा करुन हा बिकट प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
दि. 02 मे 2024 पासून चौथ्या रेल्वे लाईनच्या अंडरपासची सुरुवात झाली होती. चिखल व नाणी साचल्यामुळे विसापूर च्या ग्रामस्थांना जाणे-येणे करणे अवघड झाले होते. गाड्या घसरुन लहान-मोठे अपघात व जंगली श्वापदांची पण दहशत होती. त्यामुळे विसापूरवासी तीव्र आंदोलनाच्या मानसिकतेत होते.
मध्ये रेल्वेच्या नागपूर कार्यालयाकडून या मागणीला सकारात्क प्रतिसाद म्हणून दि. 29 जुलै 2024 ला पत्र क्र. नाग/सी./प्र.सु.धा./एमपी/चंद्रपूर-वणी-आर्णी /2024 या अंडरपास च्या अप्रोच रोडचे काम सुरु झाले असून येत्या दोन महिन्यांत काम पुर्ण करुन हा रस्ता ग्रामस्थांना वापरासाठी खुला होईल. या बद्दल विसापूर ग्रामस्थांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहेत.