चंद्रपूर: जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने धुवाधार बॅटिंग सुरू केली असून जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे तलाव फुटून अनेक घरांचे नुकसान झाले तसेच पिपळखुट हे गाव संपूर्णतः पुराणी वेढले गेले या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून पुराने नुकसान झालेल्या घराचे तात्काळ पंचनामे करून मोबदला देण्याची मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस येत असून ग्रामीण भागात काही ठिकाणी तलाव फुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यासोबतच अनेक सखल भागात पाणी साचल्याने मानवी वस्तीत पाणी शिरत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने अनेक घरात पाणी गेले आहे त्यासोबतच अनेक जनावरे देखील मृत्युमुखी पडली आहे सदर घटनेची खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दखल घेत प्रशासनाला यासंदर्भात संपर्क करीत त्यासोबतच पत्राद्वारे चिचपल्ली व पिंपळखुट या गावातील नुकसानग्रस्त घराचे तात्काळ पंचनामे करावे अशा सूचना केल्या. तसेच नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना खासदार प्रतिभा धानोकर यांनी जाहीर आव्हान करत पूरग्रस्त भागात पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी असे आव्हान देखील केले आहे. यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ पंचनामा करण्याचे मान्य केले असून लवकरच नुकसानग्रस्त नागरिकांना आथिर्क मदत देखील करणार असल्याचे मान्य केले आहे.