लोकार्पित झालेले समाजभवन कला, सांस्कृतिक आणि विचारांचे आदान-प्रदान करण्याचे केंद्र ठरावे – आ. किशोर जोरगेवार.

0
14

 

 

मूल रोडवरील लोहार समाज भवनाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण.

चंद्रपूर:- लोकार्पित झालेले समाजभवन फक्त एक वास्तू नाही, तर आपल्या एकतेचे प्रतीक आहे. इथे विविध कार्यक्रम, कार्यशाळा, संमेलने आयोजित करून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक ते उपक्रम राबवावे, हे समाजभवन कला, सांस्कृतिक आणि विचारांचे आदान-प्रदान करण्याचे केंद्र ठरावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून मूल रोडवरील लोहार समाज पोटजाती विकास संस्था येथे तयार करण्यात आलेल्या समाजभवनाच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला भास्कर कामतकर, डॉ. एस.एस. कामतकर, सुधाकर चंदनखेडे, मधुकर शेंडे, मारोतराव गथाडे, राजेंद्र मेश्राम, हेमंत मेश्राम, विजय पोहनकर, रमेश सोनटक्के आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, बाबूपेठ, संजय नगर, कृष्ण नगर, इंदिरा नगर शहरातील या शेवटच्या भागात विकासकामे करण्यावर आपण भर देत आहोत. या भागाच्या विकासासाठी मोठा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. येथील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. आपण मतदार संघात अभ्यासिका आणि समाजभवन तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. यातून समाज निर्मिती होईल अशी आशा यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

लोहार समाजाने आपल्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने समाजाच्या उन्नतीत नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. आपले पारंपरिक कला आणि व्यवसाय हे आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहेत. या भवनाच्या माध्यमातून आपल्याला एकत्र येण्यासाठी, आपल्या कला, संस्कृती आणि विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी एक विशेष जागा मिळाली आहे. आपण या भवनाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा, इथे एकत्र येऊन आपल्या समस्या, आव्हाने आणि संधींवर चर्चा करून त्यावर योग्य उपाय शोधावेत तसेच, विविध उपक्रमांमधू नवी कौशल्ये आत्मसात करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. समाजाला पुढे नेण्यासाठी युवकांनी आता जबाबदारी स्वीकारावी यात ज्येष्ठांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असेही यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here