बल्लारपूर रोड वरील सैनिकी शाळेत प्रवेशाकरीता प्रवेश परिक्षा घेतली जात असते. यामध्ये 100 जागेवरील प्रवेशाकरीता 15 जागा अनुसूचित जातीकरिता, 8 जागा अनुसुचित जमाती करीता तर उर्वरीत 77 जागेपैकी 67 टक्के जागा म्हणजे 52 जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. या 52 जागेतील 25 टक्क्यातील राखीव 13 जागा या माजी सैनिक तसेच सैनिकी शाळेतील शिक्षकांच्या पाल्यासाठी राखील आहेत. उर्वरीत 39 जागांवर सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने प्रवेशीत जागांपैकी 10 टक्के राखील जागा या चंद्रपूर जि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात समोरील अधिवेशनात तारांकीत प्रश्नाद्वारे देखील मागणी करणार असल्याची माहिती खासदार धानोरकर यांनी दिली आहे. चंद्रपूर जि जिल्ह्यात असणाऱ्या सैनिकी शाळेतून जास्तीत जास्त अधिकारी भविष्यात घडावेत यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देखील खासदार धानोरकर यांनी सांगितले आहे.
Home Breaking News सैनिकी शाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के जागा राखीब ठेवा…! खासदार प्रतिभा...