चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे फर्जी कर्मचारी कामावर दाखवून लाखो-करोडोंचे घोटाळे …! मनोज व. ठेंगणे सामाजिक कार्यकर्ता( माजी सैनिक) यांचा आरोप

0
18

 

चंद्रपूर:- महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन आणि एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे निविदा( टेंडर )सुरू आहे त्यामध्ये अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन कंत्राटदाराची अंदाजे 2018 च्या पूर्वीपासून निविदा (टेंडर) सुरू असून यांचे स्लीट हॉपर सीएचपी -500 येथे फर्जी कर्मचाऱ्यांची संख्या दाखवून कर्मचाऱ्याला मिळत असलेले वेतन कंत्राटदार घरबसल्या घेत आहे.

 

त्याचप्रमाणे एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कंत्राटदाराचे सुद्धा अंदाजे 2018 च्या पूर्वीपासून निविदा (टेंडर) सुरू असून सी एच पी बी मध्ये कार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांची फर्जी संख्या दाखवून कर्मचाऱ्याला मिळत असलेले वेतन कंत्राटदार घरबसल्या घेत आहे. या कंत्राटदार द्वारे होत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांना मिळणारे वेतन या घोटाळ्याची कल्पना महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांना असावी हे नाकारता येत नाही असा ही आरोप समोर सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज वसंत ठेंगणे यांनी केलेला आहे. समोर त्यांनी सांगितले की आज भारतात बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न समोर असताना असे कंत्राटदार जर कामावर फर्जी कर्मचारी दाखवून त्यांचे वेतन घरबसल्या घेत असेल तर चंद्रपुरातील बेरोजगार युवकांनी फक्त महाऔष्णिक विद्युत केंद्रा पासून होणाऱ्या प्रदूषणाला बळी पडायचे काय असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज ठेंगणे यांनी मुख्य अभियंता यांच्या समोर मांडलेला आहे.समोर त्यांनी सांगितले की जर अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन आणि एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची चौकशी करून यांचे आपल्या कंपनीत सुरू असलेले निविदा (टेंडर )बंद करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले नाही तर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी समोर दिलेला आहे. याप्रसंगी इथे सामाजिक कार्यकर्ता मनोज ठेंगणे (माजी सैनिक), सूर्या अडबाले (संस्थापक स्वराज्य शेतकरी संघटना), श्री प्रेम चांदेकर,श्री मनीष सूर्यवंशी,श्री.आकाश रायपुरे ,श्री.हिमांशू शेंडे, श्री.साहिल कराडवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here