चंद्रपूर:- लोेकशाही च्या मजबुतीसाठी मतदानाचा अधिकार असणे क्रम प्राप्त आहे. त्यासाठी शासनातर्फे मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जातो. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या अभियानात काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.
लोकसभेच्या निवडणूक आटोपताच विधानसभेच्या निवडणूकीची चाहूल लागली आहे. निवडणूक आयोगातर्फे नव-मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव-मतदारांची नोंदणी होणे अपेक्षीत आहे. त्या सोबतच निवडणूक ओळखपत्रात दुरुस्ती व पत्ता बदल देखील करण्यासाठी सदर मोहीम राबविण्यात येत आहे. शासनातर्फे ही मोहीम 24 जुन ते 24 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा व शहर ग्रामीण च्या वतीते नव-मतदार नोंदणी अभियान प्रभावीपणे राबण्यिासाठी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीतून चंद्रपूर शहरात मागील निवडणूकीत ज्यांची नावे गहाळ झाली किंवा मतदार यादीत नव्हती, त्यासोबतच पत्ता बदल, नावात बदल करायचा असल्यास सर्व पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या प्रभागात मतदार नोंदणीचे शिबिर आयोजित करावे असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. यासंदर्भात चंद्रपूर शहर काँग्रेस वेळा पत्रक निश्चित करुन चंद्रपूर शहरातील सर्व प्रभागात शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपले नावाची तपासणी करुन येणाऱ्या निवडणूकांसाठी मतदार यादी तपासून घ्यावी असे आवाहन देखील नागरिकांना केले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांनी नव-मतदार नोंदणी अभियान यशस्वी करावे अशा सुचना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.