अलिकडेच 4 जुन रोजी देशात लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला. चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्रात लोकांनी भाजपा ला नाकारुन कॉग्रेस च्या प्रतिभा धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करुन दिले. महाराष्ट्रातील दिग्गज मंत्री म्हणून प्रसिध्द असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव करुन विजयी झालेल्या प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल असे अनेक जानकारांचे मत होते. राजकीय अनुभव कमी असलेल्या प्रतिभा धानोरकर यांची लढाई राजकीय अनुभवाने समृध्द असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होती. परंतु या लढाईत सुक्ष्म नियोजनाच्या जोरावर प्रतिभा धानोरकर यांनी जनतेचा आर्शिवाद प्राप्त करत तब्बल 2 लाख 60 हजार मतांनी विजय प्राप्त केला. विदर्भात सर्वात जास्त मतांनी विजय प्राप्त केल्याने मुंबई येथील टिळक भवनात दि. 07 जुन रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी तर्फे प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी त्यांनी कॉग्रेस च्या सर्व जेष्ठ नेत्यांचे आभार मानत त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राचा विकास साधणार असल्याचे बोलून दाखविले. यावेळी अनेक मान्यवरांनी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांचे अभिनंदन करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश निरिक्षक रमेश चेनीथल्ला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, त्यासोबतच माजी मंत्री तथा खासदार वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, कोल्हापूरचे खासदार शाहु महाराज यासह महाराष्ट्रातील सर्व कॉगेसचे नवनियुक्त खासदारांची उपस्थिती होती.