चंद्रपूर: महिलांना नवी दिशा देत समाजाला उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाताना खेळाडूंना सुध्दा प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. हे ध्यानात घेऊन नई दिशा बहुउद्देशीय संस्थेकडून व्हॉलीबॉल खेळाडूंना कीट चे वितरण कऱण्यात आले. एवढेच नव्हे तर जिल्हा स्तरिय सामन्याकरिता तृतिय पुरस्कर सुध्दा संस्थेने दिला.
साई स्पॉटिंग क्लब कडून ही वॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धक मुलांना टी-शर्ट व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ पूजा नरेश शेरकी, श्रीमती रेखा जाधव, सरिता मालू इत्यादी उपस्थित होते. राजुभाऊ वनकर यांच्या स्मुती प्रितर्थ हे खुले पुरुष व्हॉलीबॉल सामने आयोजित कऱण्यात आले होते. सातत्याने सामाजिक उपक्रमात आपलीं वेगळी नोंद करणाऱ्या नई दिशा संस्थेने गेल्या काही काळापासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमाचे स्वागत साई स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष अदित्य साळवे, शिवम तवाकरे, सादीक शेख
मोहन बांदुरकर, मंथन होंगे, सिमोन दास यांनी केले आहे.