चंद्रपूर- भारतीय स्वातंत्र्य समरातील धगधगते अग्निकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती चंद्रपूर महानगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भाजपा व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे साजरी करण्यात आली.
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज अहीर यांच्या मार्गदर्शनात शहरातील बस स्टॅन्ड परिसरातील सावरकरांच्या स्मृतीस्थळावर हा जयंत्योत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपा नेते खुशाल बोंडे, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, कमल स्पोर्टींग क्लब चे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, माजी नगरसेविका मायाताई उईके, चंद्रकला सोयाम, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, वंदना संतोषवार, गिरिष अणे, प्रकाश आवळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्रास माल्यार्पण करुन त्यांच्या स्मृतीस उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंचाचे प्रकाश आवळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सावरकरांच्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील त्याग व कार्याचा गौरवपूर्ण शब्दांमध्ये परिचय करुन दिला. माजी महापौर अंजली घोटेकर यांनी सावरकरांनी मातृभुमीसाठी काळ्या पाण्याची शिक्षा तर भोगलीच परंतु भारतीयांच्या मनामनामध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आपल्या धारदार लेखणीतून स्वातंत्र्य लढ्याला नवे आयाम देवून लोकांमध्ये प्रेरणा प्रसवली त्यांचे योगदान अभुतपूर्व असून त्यांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
या जंयती उत्सवात रमेश भुते, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, राजेंद्र खांडेकर, दिवाकर पुद्दटवार, प्रदिप किरमे, गौतम यादव, श्रीकांत भोयर, बि.बि.सिंह, संयज खनके, शषिकांत म्हस्के, तुषार मोहुर्ले, राजेश वाकोडे, राजु वेलंकीवार, रवि येणारकर, देवानंद साखरकर, तुषार मोहुर्ले, प्रकाश ताठे, मुग्धा खांडे, मयुर भोकरे, विशाल गिरी, गिता महाकुळकर, गुरुदास मंगर, हेमंत डहाळे, गंगाधर कुंटावार, अरुणा चौधरी, शालु वासमवार, स्मिता श्रीगडीवार, वाणी राव, अक्षय ठक्कर यांचेसह अनेक सावरकर प्रेमींची उपस्थिती होती.