रामनगर गुन्हे शोध पथकाने अट्टल गुन्हेगार कळून वेगवेगळ्या चोरीच्या ८ मोटार सायकल व घरफोडीचे गुन्ह्यातील सोने चांदीचे माल हस्तगत.

0
15

चंद्रपूर:-  पोस्टे रामनगरं गुन्हे शोध पथकाने अट्टल गुन्हेगाराकडुन वेगवेगळया दाखल गुन्हयातील चोरीच्या ८ मोटार सायकल व घरफोडीचे गुन्हयातील सोने चांदीचे माल हस्तगत केला.

फिर्यादी नामे खुर्शीदा बानु रहीम शेख वय ४५ वर्ष, धंदा घरकाम जात मुस्लीम रा. पागलबाबानगर मेडीकल कॉलेज रोड अहुजा गॅरेज जवळ चंद्रपूर यांनी दिनांक ८/५/२४ रोजी पोस्टे रामनगर येथे रिपोर्ट दिला की, दिनांक ४/५/२४ रोजी त्याचे परीवार नातेवाईक यांचे लग्न कार्यक्रमाला गेले व लग्न कार्यक्रम आटपून दिनांक ७/५/२४ चे १३/०० वा. दरम्यान परत आले. असता फिर्यादीला अंगणात ठेवलेली जुनी वापरती पॅशन प्रो मो.सा. क. एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ ही दिसली नाही तसेच घराचे मागील दरवाजाचा लॉक तुटुन दिसल वरून फिर्यादीने घरी जावून पाहाणी केली असता तिचे बेडरूमधील ३ लोखंडी आलमारीमधुन १) कि.अं. १५,००० सोन्याचे नेक्लेस वजन ५ ग्रॅम २) कि.अं. १८,००० सोन्याचे टाप्स ३ जोड (६नग) वजन ६ ग्रॅम ३) ३) कि.अं. ३०,००० रू सोन्याचे मंगळसुत्र वजन १० ग्रॅम ४) कि.अं. ९,००० रू सोन्याचे मंगळसुत्र मणी व डोरले असलेले वजन ३ ग्रॅम ५) कि.अं. ६,००० रू एक सोन्याची अंगठी वजन २ ग्रॅम ६) कि.अ. १२०० 석 चांदीचे चाळ २ जोड ७) कि.अं. १००० रू चांदीचे अंगठी ६ जोड ८) कि.अं. २०,००० रू एक जुनी वापरती पॅशन प्रो मो.सा. क. एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ असा एकुण १,००,२०० रू चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे निदर्शनास आल्याने आरोपीने दिलेल्या रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अप क. ४८६/२४ कलम ४५४,४५७,३८० भादवी चा गुन्हा करून तपासात घेतला.

 

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान मुखबीरकडुन खात्रीशीर खबर मिळाली की एक इसम जुनोना चौक बाबुपेठ परीसरात एक जुनी वापरती पॅशन प्रो मो.सा. क. एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ ही विकी करीता ग्राहक शोध आहे अशा खबरेवरून गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन जुनोना चौक बाबुपेठ परीसरातुन एका संशयीत इसमास पॅशन प्रो गाडी क. मो.सा. क. एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ सह ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव निखील अनिल मैकलवार वय २४ वर्ष, रा. बल्लारशा हा जुनोना चौक चंद्रपूर असे सांगीतले वरून त्याला त्याचे तिथे येण्याचे कारण विचारले असता त्याने कोणतेही समाधानकार उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्याला अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत पागलबाबा नगर मेडीकल कॉलेज जवळील घरी चोरी करून पॅशन प्रो मो.सा.क्र. एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ ही मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले तसेच त्याने व त्याचे साथीदार विधीसंघग्रस्त बालक रा. बल्लारशा हयांनी मिळुन पोस्टे रामनगर, बल्लारशा, चंद्रपूर शहर, नागपूर शहर येथुन वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केल्याने नमुद आरोपी हयास अटक केली व त्यांचेकडुन तपासादरम्यान नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला.

१) पोस्टे रामनगर अप क. ४८६/२४ कलम ४५७, ३८० भादवी मधील चोरीस गेलेली पेंशन प्रो मो.सा. क. एम.एच. ३४ बि.ई. ९३६५ व गुन्हा करतेवेळी वापरलेली टिव्हीएस ज्युपीटर मोपेड क. एम.एच.३४ बि.डब्लु. १३०१, सोन्याचे टाप्स व चांदीचे चाळ

२) पोस्टे रामनगर अप क. ४७७/२४ कलम ३७९ भादवी मधील होडा अॅक्टीवा मोपेड गाडी क.एम.एच. ३४ ए.एन.१२०९

३) पोस्टे रामनगर अप क. ५०६/२४ कलम ३७९ भादवी मधील होडा अॅक्टीवा मोपेड गाडी क्र. एम.एच. ३४ बि. के. ६४२७

४) पोस्टे चंद्रपूर शहर अप क. ४२८/२४ कलम ३७९ भादवी मधील हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा एम.एच. ३४ बि. सी ०७४८ ही आहे. ५) पोस्टे चंद्रपूर शहर अप क. ३९७/२४ कलम ३७९ भादवी मधील टिव्हीएस ज्युपीटर मोपेड गाडी क्र.एम.एच. ३४ सि.ए. ८१२०

६) पोस्टे बल्लारशा अप क. ५२१/२४ कलम ३७९ भादवी मधील होंडा अॅक्टीवा मोपेड गाडी क. एम.एच. ३४ ए.डब्लु ८०२५ ही आहे. ७) पोस्टे धंतोली नागपूर शहर अप क. १३३/२४ कलम ३७९ भादवी मधील टिव्हीएस ज्युपीटर मोपेड गाडी क. एम.एच. ४० सि.ई. ६७९१ ही आहे.

अश्या ८ मोटार सायकली व सोना चांदीचे दागीने मिळुन एकुण २,९६,६०० रू चा माल हस्तगत करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पो.नि. यशवंत कदम, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे सपोनी देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा /१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / २४५४ प्रशांत शेंदरे, पोहवा / ११६५ आनंद खरात, नापोशि / २४३० लालु यादव, पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि २५१३ विकास जुमनाके, पोशि / ६९९ विकास जाधव, पोशि १२३०/ पंकज ठोंबरें, मपोहवा/४६२ मनिषा मोरे यांनी कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here