शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था.
चंद्रपुर : श्री. वासवी कन्यका मातेचा प्राणप्रतिस्थापना दिन आणि जयंती महोत्सव निमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जटपूरा गेट येथे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, शहर संघटक विश्वजीत शाहा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
श्री. वासवी कन्यका मातेचा प्राणप्रतिस्थापना दिन आणि जयंती महोत्सवा निमीत्त आर्य वैश्य समाजाच्या वतीने शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली. श्री. कन्यका माता मंदिर येथून या शोभायात्रेला सुरवात झाली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जटपुरा येथे स्वागत मंच उभारण्यात आले होते. सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान सदर शोभायात्रा यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहोचली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत करत श्री. कन्यका माता यांच्या पालखीला माल्यार्पण केले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.