शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षपदी (कामगार) दिपक कामतवार यांची नियुक्ती!

0
22

 

कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या हस्ते नियुक्ति पत्र!

चंद्रपुर :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांनी चंद्रपुर येथे आज दि. 22 अप्रैल 2024 रोज सोमवारला चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे कामगार वर्ग व वाहतूकीची फार मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगार संघटनेचा विस्तार करण्याच्या आदेशानुसार चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षपदी (कामगार) दिपक कामतवार यांची नियुक्ति करुन कामगारांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी देवून नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदर नियुक्ति करताना शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, वाहतुक संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख विनोद बूटले , शिवसेना चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here